रामनवमीला बाबा रामदेव १०० जणांना देणार संन्यासाची दीक्षा

    23-Mar-2023
Total Views | 60
baba-ramdev-will-give-sanyas-diksha-to-youths-amit-shah-and-yogi-adityanath-will-attand-program-2023

हरिव्दार
: रामनवमीचे औचित्य साधून योग गुरू बाबा रामदेव १०० जणांना संन्यासाची दिक्षा देणार आहेत. यासाठी पतंजली योग पीठाद्वारे बुधवार नव संवत्सर चैत्र नवरात्री निमीत्त भव्य संन्यास दीक्षा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.
 
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत होणार्‍या या कार्यक्रमात ४० महिला आणि ६० पुरूष रामनवमीच्या दिवशी बाबा रामदेव यांच्या कडून दीक्षा घेतील, यासोबत तब्बल ५०० महिला आणि पुरूषांना रामदेव यांच्या सहकारी आचार्य बालकृष्ण ब्रम्हचर्याची दीक्षा देणार आहेत.

चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देव गिरी यांच्या उपस्थितीत संन्यास दीक्षा सोहळ्याला सुरुवात झाली. रामनवमीला संन्यास दीक्षेनंतर दुसर्‍या दिवशी आशीर्वादाचा कार्यक्रम होईल. स्वामी गोविंद देव यांनी संन्यास परंपरेत दीक्षा घेतलेल्यांना संबोधित करताना म्हणाले की, वैदिक परंपरेतील सर्वोच्च पुष्प म्हणजे संन्यास होय.

संन्यासीला वाटले पाहिजे की तो भगवंताच्या रूपात सृष्टीच्या सेवेसाठी समर्पित आहे. रामनवमीच्या दिवशी चार वेदांच्या महापारायण यज्ञाच्या पूर्ततेबरोबरच नवीन तपस्वींना प्राचीन ऋषींच्या संन्यास परंपरेची दीक्षा दिली जाईल, अशी माहिती बाबा रामदेव यांनी दिली. पतंजलीमध्ये स्त्री-पुरुष, जात, धर्म, पंथ, धर्म असा कुठलाही भेद नाही असेही बाबा रामदेव यांनी यावेळी सांगीतले.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121