दिमापूर : नागालँड या राज्यात आजवर झालेल्या सर्व १४ विधानसभा निवडणुकीत म्हणजेच ६० वर्षात एकही महिला आमदार निवडून आलेली नाही. यदां प्रथमच भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या हेकानी जाखलू या पहिल्या महिला आमदार बनल्या आहेत. हेकानी यांनी दिमापूरच्या जागेवर लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) नेते अझेतो झिमोमी यांचा १,५३६ मतांनी पराभव करून विजय मिळवला.