मराठी भाषा दिनानिमित्त महाराष्ट्रेतर कवींचा गौरव

    20-Feb-2023
Total Views | 122

hydrabad 
 
मुंबई : तेलंगणातील हैद्राबाद येथे "कलाभिषेक परिवार" ही संस्था गेले २५ वर्षे कार्यरत आहे. आपल्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून एक खास कार्यक्रम आयोजित केला आहे. मराठीतील ज्येष्ठ कवी,लेखक प्राचार्य सूर्यकान्त वैद्य यांचा 'सायंतन' हा कवितासंग्रह आणि त्यांच्या कवितांची समीक्षा आणि आस्वाद घेणारा 'अंतर्वेध' या २ ग्रंथांचा प्रकाशन सोहळा आयोजित केला आहे.
 
यावेळी, वैद्य यांच्या मराठीतील योगदानासाठी त्यांना 'साहित्य गौरव पुरस्कार' देऊन सन्मानित केले जाणार आहे. वैद्य हे आपल्या ललित व शास्त्रीय लेखनासाठी प्रसिद्ध आहेत. ह्या कार्यक्रमप्रसंगी त्यांच्या गायिलेल्या काही गीतांचा आणि कवितासादरणीकरणाचा मनोरंजक कार्यक्रमही आयोजिला आहे.
 
सदर कार्यक्रम मराठी ग्रंथ संग्रहालय,कोटी,हैद्राबाद येथे सायंकाळी ठीक ६.३० वाजता होणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे अगत्याचे आवाहन संस्थेच्या सचिव सौ.सरोज घारापुरीकर यांनी केले आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121