अरविंद सावंतांच्या मतदारसंघावर काँग्रेसचा डोळा!

    31-Dec-2023
Total Views | 54

Arvind Swant & Milind Deora


मुंबई : उबाठाचे खासदार अरविंद सावंत हे मोदीलाटेत निवडून आले असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील जागावाटपावरून सुरु असलेले वादविवाद पुन्हा एकदा समोर आल्याचे बोलले जात आहे. शनिवारी महाराष्ट्र टाईम्सशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
 
अरविंद सावंत हे मोदीलाटेत निवडून आलेले खासदार असून त्यावेळी मी इतरांच्या तुलनेत कमी फरकाने पराभूत झालो होतो, असे मिलिंद देवरा म्हणाले आहेत. दक्षिण मुंबई मतदारसंघ हा काँग्रेसचा असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तसेच या मतदारसंघातील अनेक कामे प्रलंबित आहे, असे म्हणत त्यांनी अरविंद सावंत यांच्यावर निशाणा साधला आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहे. "



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121