नाशिक : वडाळा पाथर्डी रोड येथील, श्रीजयनगर अपार्टमेंट येथे अयोध्येहून अभिमंत्रित केलेल्या "अक्षता कलशाचे दर्शन व पूजन सोहळा"अत्यंत उत्साहात पार पडला.यावेळी रामजन्मभूमी न्यासाचे रोहित गायधनी यांनी १ ते १५ जानेवारी दरम्यान होणाऱ्या "अक्षता वाटप" अभियानाची माहिती दिली. अपार्टमेंट मधील सभासदांनी उस्फूर्तपणे परिसरात रांगोळी काढून, फटाके फोडत रामनाम जप करून कलशाचे पूजन केले. यामध्ये बालकांना सीता व श्रीराम यांचा वेश परिधान करून त्यांचे पूजन करण्यात आले. साईराज गिरीश शिंदे यास प्रभू श्रीराम रुपात व आराध्या आनंद देशपांडे हिला सीता मातेच्या रूपात दाखविण्यात आले.
दैनंदिन अग्निहोत्र साधक रोहन भोसले यांनी सपत्नीक कलशाचे पूजन व हवन केले, त्यानंतर अग्निहोत्राचा प्रचार व प्रसार करणारे अयोध्या येथील डॉ. रामेश्वर माहेश्वरी यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. गिरीश व सीमा शिंदे, अमृतकर, रामनाथ गवारे यांनी सपत्नीक श्रीरामाची महाआरती केली. यावेळी चंद्रकांत ठाकूर, श्रावण शिंदे, उर्मिला वाटवे, अभियानाचे वस्ती प्रमुख आनंद देशपांडे, संतोष रेवगडे पाटील, विवेक तरटे यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सीमा शिंदे, प्राजक्ता कापसे, मेघा पाटील, शिवम पाटील, श्रुती कापसे, प्रतीक अमृतकर, शौर्य अमृतकर, अर्जुन मीशाळ, यश शिंदे, संस्कृती शिंदे, सौ. बधान, विद्या देशपांडे यांनी विशेष परिश्रम घेतले.