घरच्यांच्या रागाने घराबाहेर पडलेल्या महिलेवर रियाझने त्याच्या साथीदारांसह केला सामूहिक बलात्कार!

    28-Dec-2023
Total Views | 281
 
Riaz
 
 
लखनौ : उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे रियाझ उर्फ ​​मुघल-ए-आझम याने त्याच्या साथीदारांसह एका विवाहित महिलेचे अपहरण केले आणि त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ही घटना 25 डिसेंबर 2023 च्या रात्री घडली होती. आता पोलिसांनी सामूहिक बलात्कार प्रकरणी रियाझ आणि त्याच्या चार साथीदारांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिडीतेचे तिच्या कुटुंबियांसोबत काही कारणास्तव भांडण झाले होते. ती रागाच्या भरात गावाबाहेर रस्त्यावर गेली होती, मात्र तिचा राग शांत होऊन ती परत येत असताना रियाज आणि त्याच्या साथीदारांनी तिचे अपहरण करुन सामूहिक बलात्कार केला.
 
ही घटना बाराबंकीच्या देवा पोलीस स्टेशन परिसरात घडली. पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, 25 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मुलीचा तिच्या सासरच्यांसोबत वाद झाला.त्यानंतर ती रागावली आणि घर सोडून रस्त्याच्या दिशेने निघून गेली. राग शांत झाल्यावर तिने घरी परतत असताना दरम्यान, वाटेत तिला देवा येथील रहिवासी आरोपी मुघल-ए-आझम उर्फ ​​रियाझ आणि त्याचे तीन साथीदार भेटले. पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये तिचे अपहरण करून तिला देवा बीएसएनएल टॉवरजवळ नेले आणि एका इमारतीत ठेवले. यानंतर आरोपींनी पीडितेवर सामुहिक बलात्कार केला.
 
 
 
पीडित महिलेने पहाटे वडिलांना फोन करून घटनेची माहिती दिली. यानंतर पीडितेच्या भावाने 112 वर पोलिसांना फोन केला. मात्र, पोलिस पोहोचेपर्यंत गुन्हेगार पळून गेले होते. याप्रकरणी पीडितेच्या वडिलांनी मंगळवारी देवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध कलम 376 (बलात्कार), 342 (चुकीच्या पद्धतीने बंदिस्त ठेवणे) आणि SC/ST कायद्याच्या कलम 3(2)(v) अंतर्गत गुन्हा दाखल केला.
 
दरम्यान, बाराबंकीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक (उत्तर) सीएन सिन्हा यांनी सांगितले की, या प्रकरणातील मुख्य आरोपी रियाझला अटक करण्यात आली आहे. चौकशीदरम्यान, आरोपीने त्याच्या साथीदारांची ओळख उघड केली, ज्यांची ओळख भुरे, शब्बू आणि इस्माइउद्दीन अशी आहे. त्यानंतर पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले. सिन्हा यांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि गुन्हेगारांविरुद्ध पुरावे सापडले. यानंतर अन्य तीन आरोपींनाही अटक करण्यात आली. तसेच पीडितेची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाई करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121