राम मंदिर उद्घाटनावेळी मुंबईकरांसाठी भव्य दीपोत्सव आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन!

मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने होणार कार्यक्रमांचे आयोजन

    28-Dec-2023
Total Views | 65

Banganga Deepotsav


मुंबई :
कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने राम मंदिर उद्घाटनावेळी मुंबईकरांसाठी भव्य दीपोत्सव आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. वाळकेश्वर येथील बाणगंगा तलाव येथे या कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल.
 
समस्त भारतीयांच्या अध्यात्मिक, सांस्कृतीक आणि राष्ट्रीय अस्मितेचा मानबिंदु असलेल्या अयोध्या येथील प्रभु श्रीराम मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी संपन्न होणार आहे. यादिवशी अयोध्या येथील मंदिरात श्रीरामांची प्राण प्रतिष्ठापणा होणार आहे. यानिमित्ताने मुंबईतील वाळकेश्वर येथील प्रभु श्रीराम यांच्या चरणांनी पावन झालेल्या ऐतिहासिक बाणगंगा तलाव येथे २२ जानेवारी रोजी सायंकाळी महापालिकेच्या माध्यमातून भव्य स्वरूपात दिपोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
 
राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रयत्नांतून ऐतिहासिक बाणगंगा तलाव येथे दीपोत्सव आणि विविध कार्यक्रमांची योजना आखण्यात आली आहे. याअंतर्गत बाणगंगा तलाव येथे २२ जानेवारी २०२४ रोजी दीपोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. हा दीपोत्सव सर्व मुंबईकरांसाठी खुला असणार आहे. त्याचप्रमाणे राम मंदिरात प्राण प्रतिष्ठापना झाल्यानंतर त्याचदिवशी मलबार हिल विधानसभा क्षेत्रातील सर्व मंदिरांमध्ये महाआरतीचे आयोजन करण्यात येणार असून प्रसाद वाटप देखील होणार आहे.
 
मंत्री लोढा यांच्या पुढाकाराने आणि मुंबई महापालिकेच्या माध्यमातून ५ ते १५ जानेवारी दरम्यान शाळकरी मुलांसाठी मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम जीवन चरित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेदरम्यान चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, कविता लेखन आणि नाट्य स्पर्धा अशा स्पर्धा होणार असून पहिली ते पाचवी प्राथमिक गट आणि सहावी ते दहावी माध्यमिक गट अशी विभागणी करण्यात आलेली आहे.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121