दिल्लीत इस्त्राईल दुतावासजवळील स्फोटाचे गाझा कनेक्शन? तपासात महत्त्वाची माहिती उघड

    27-Dec-2023
Total Views | 62
 
Delhi blast
 
 
नवी दिल्ली : चाणक्यपुरी भागातील इस्त्राइलच्या दुतावासाजवळ मोकळ्या स्थितीत असलेल्या एका प्लॉटमध्ये स्फोट झाल्याची घटना २६ डिसेंबर २०२३ च्या संध्याकाळी घडली. स्फोटानंतर दिल्ली पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि येथून एक पत्र जप्त केले. त्यात जिहाद, अल्ला हू अकबर आणि गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा उल्लेख आहे. स्फोटाची माहिती मिळताच दिल्ली पोलीस बॉम्बशोधक पथक आणि फॉरेन्सिक टीमसह घटनास्थळी पोहोचले.
 
 
दिल्ली पोलिसांनी परिसर सील करून परिसराची तपासणी केली असता हा स्फोट कमी वारंवारतेचा असल्याचे आढळून आले. दिल्ली पोलिसांच्या तपास पथकाने याच प्लॉटमधून एक पत्रही जप्त केले आहे. हे पत्र इस्रायलच्या राजदूताला उद्देशून लिहिले आहे. पत्राची भाषा अत्यंत असभ्य असून त्यात शिवीगाळही करण्यात आली आहे. हे पत्र इस्त्रायली ध्वजात गुंडाळले होते. पत्रात गाझा पट्टीत सुरू असलेल्या इस्लामिक दहशतवादविरोधी कारवाई थांबवण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यात 'अल्लाह-हू-अकबर' आणि 'जिहाद' अशा इस्लामिक घोषणांचा वापर करण्यात आला आहे.
 
 
दिल्ली पोलिसांशिवाय राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीनेही (एनआयए) स्फोटाच्या ठिकाणी तपास केला आहे. तपासात स्फोटाच्या ठिकाणी कोणतेही अवशेष आढळले नाहीत, त्यामुळे सुरुवातीला हा रासायनिक स्फोट मानला जात आहे. मात्र, चौकशीनंतरच संपूर्ण माहिती समोर येईल. स्फोट घडवणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी जवळपासचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहेत. दिल्ली पोलिसांनी सीसीटीव्हीमध्ये नुकतेच दोन लोक पाहिले आहेत, ज्यांच्यावर या स्फोटात संशय व्यक्त केला जात आहे. दिल्ली पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने त्यांची ओळख पटवली असून त्यांचा शोध सुरू आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
पाकविरोधात आणखी एक मोठे पाऊल!

पाकविरोधात आणखी एक मोठे पाऊल! 'या' स्टेडियममधील ‘वॉल ऑफ ग्लोरी’ वरून हटवले पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे फोटो

(Jaipur's Sawai Mansingh Stadium removed Photos of Pakistani Cricketers) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर वाढलेला भारत-पाकिस्तान मधील तणाव आता हळूहळू निवळत आहे. मात्र या तणावाचा थेट परिणाम भारतीय क्रिडाविश्वावर झाल्याचे दिसून आले. या संवेदनशील काळात दोन्ही देशांकडून आपापल्या क्रिकेट लीग्स पुढे ढकलण्यात आल्या होत्या. तर या पार्श्वभूमीवर आता राजस्थान क्रिकेट असोसिएशनकडून (आरसीए) आणखी एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. जयपूरमधील सवाई मान सिंग स्टेडियममधील 'वॉल ऑफ ग्लोरी' वरून पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे फोटो काढून टाकण्या..

विज्ञानयोगी खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन!

विज्ञानयोगी खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन!

मराठी मनांसाठी विज्ञान साहित्याचे समृद्ध दालन खुले करुन देणारे प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ, विज्ञान लेखक जयंत नारळीकर यांचे २० मे रोजी रोजी पुण्याच्या राहत्या घरी निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार निद्रीस्त असतानाच अनंतात विलीन झाले. त्यांच्या जाण्यामुळे केवळ मराठी साहित्यच नव्हे तर सबंध विज्ञानविश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनामुळे वैज्ञनिक, साहित्यिक तसेच शिक्षण क्षेत्रातील तेजस्वी तारा मावळला अशी प्रतिक्रिया वाचकांनी व्यक्त केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121