मिमिक्री प्रकरण भोवलं! राहुल गांधींविरुद्ध तक्रार दाखल
21-Dec-2023
Total Views | 55
नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उपराष्ट्रपतींचे मिमिक्री प्रकरण चांगलेच भोवले आहे. त्यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून अटकेची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणल्याने संसदेतून १४४ खासदारांचे निलंबन करण्यात आले. त्यानंतर विरोधकांनी संसदेच्या पायरीवर निदर्शने केली. त्याचवेळी तृणमुल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची मिमिक्री करत त्यांची खिल्ली उडवली आणि राहूल गांधी हे त्यांचा व्हिडीओ बनवत होते.
दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यानंतर आता याप्रकरणी राहूल गांधी यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. नागपूरच्या गणेशपेठ पोलिस ठाण्यात भाजपकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच राहूल गांधींच्या अटकेची मागणीही तक्रार कर्त्यांकडून करण्यात येत आहे.