नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी भीमा कोरेगाव दंगल आणि दिल्लीतील हिंदूविरोधी दंगलीतील संबंधित भूमिकांसाठी अटक करण्यात आलेल्या शोमा सेन आणि उमर खालिद यांचे समर्थन करणारी प्रतिक्रीया नोंदवली आहे. आपल्या 'एक्स' अकाउंटवर त्यांनी यासंदर्भात पोस्ट केली आहे.
उमर खालिदच्या समर्थनार्थ एका 'एक्स' वापरकर्त्याने केलेल्या पोस्टवर प्रतिक्रीया देताना दिग्विजय सिंह यांनी शोमा सेन आणि उमर खालिद यांना अल्पसंख्याकांसाठी आवाज उठवल्याबद्दल तुरुंगवास भोगावा लागल आहे असे म्हटले आहे. "आदरणीय सरन्यायाधीश, प्रोफेसर शोमा सेन आणि उमर खालिद यांना तुरुंगात ठेवणे हा न्याय आहे का? न्यायास विलंब म्हणजे न्याय नाकारणे होय यावर माझा विश्वास आहे. भीमा कोरेगाव आणि सिएए/एनआरसी या अशाच प्रकारच्या केस आहेत. यात आरोपी कोण आहेत? दलितांसाठी जे बोलले आणि अल्पसंख्याकांसाठी जे बोलले". अस त्यांनी म्हटलं आहे.
Most respected Hon CJI Your Lordship is it Justice to keep Prof Soma Sen and Umar Khalid in Jail? I always believed “Justice delayed is Justice denied” Bhima Koregaon and CAA/NRC are two such cases. Who are the accused? Who spoke up for Dalits and who spoke up for Minorities. 1/n https://t.co/yvfwCGkR8K
"आपली भारतीय राज्यघटना एससी एसटी आणि अल्पसंख्याकांना संरक्षण देत नाही का? त्यांच्या बाजूने बोलणे हा गुन्हा आहे का?" असही ते पुढे म्हणाले आहेत.
शोमा सेन यांना ८ जून २०१८ रोजी भीमा कोरेगाव हिंसाचारात सहभाग असल्याच्या आरोपावरुन पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्यावर ' य़ुएपीए' (Unlawful Activities Prevention Act) कायद्यांतर्गत आरोप ठेवण्यात आले होते. ३१ डिसेंबर २०१७ रोजी महाराष्ट्रातील भीमा कोरेगाव गावातील आयोजित 'एल्गार परिषदेदरम्यान' हा हिंसाचार झाला होता.
तर उमर खालिदवर दिल्लीतील हिंदूविरोधी दंगलीतील मुख्य आरोपी म्हणून य़ुएपीए' (Unlawful Activities Prevention Act) कायद्यांतर्गत आणि भारतीय दंड संहितेच्या अनेक तरतुदींनुसार गंभीर आरोप करण्यात आले आहेत. खालिदला सप्टेंबर २०२० मध्ये अटक झाल्यापासून अनेक वेळा त्याचे जामीन अर्ज फेटाळण्यात आले आहेत.