मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत लागलेल्या निकालात भाजपची सरशी झाली आहे. भाजप आमदार नितेश राणेंनी पाच पैकी चार ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. जिल्ह्यात राणेंचा करिश्मा कायम आहे. तर, ठाकरे गटाला मोठा दणका मिळाला आहे. सिंधुदुर्गात आचरा ग्रामपंचायत भाजपाकडे आली आहे. कुडाळ वालावलमध्ये ही भाजपाचे वर्चस्व दिसुन येत आहे.
कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत हळवलमधून प्रभाकर श्रीधर राणे 236 मते मिळवत विजयी ठरले, त्यांच्या विरुद्ध असलेले सुभाष भिवा राणे यांना 167 मते मिळाली, तर नोटाला 3 मते मिळाली. कणकवली तालुका ओटव ग्रामपंचायत निवडणुकीतील सरपंचांसह ७ ही उमेदवार विजयी झाले आहेत. ठाकरे गटाचे वैभव नाईक यांना मोठा धक्का मिळाला आहे.