केदारनाथमध्ये लोकांनी "मोदींच्या" घोषणा देत केले राहूल गांधींचे स्वागत!
05-Nov-2023
Total Views | 112
देहरादून : काँग्रेस नेते राहूल गांधी ५ नोव्हेंबर रोजी उत्तराखंडमधील केदारनाथ धाम येथे पोहोचले आहेत. दरम्यान, तेथील लोकांनी मोदी-मोदी अशा घोषणा देत त्यांचे स्वागत केले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
राहूल गांधी केदारनाथ मंदिरात दर्शनासाठी जात असताना रांगेत उभ्या असलेल्या भाविकांनी राहुल गांधींना पाहताच मोदी आणि जय श्री रामच्या घोषणा दिल्या. राहुल गांधी तिथे पोहोचताच सर्व बाजूंनी लोक मोदी-मोदीच्या घोषणा देऊ लागले. भाजपच्या आयटी सेलचे राष्ट्रीय प्रभारी अमित मालवीय यांनी याबाबतचा व्हिडिओ शेअर केला आहे.
दरम्यान, राहुल गांधींनी केदारनाथ मंदिरात पूजा केली. विमानतळावर पोहोचताच पक्षाच्या नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. राहूल गांधी तीन दिवसीय केदारनाथ दौऱ्यावर असून हा त्यांचा वैयक्तिक आध्यात्मिक दौरा असल्याचे सांगण्यात येत आहे.