सिंधूदुर्ग तो बहाना है, पेंग्विन को कलाकारोके साथ नाचना है!

युवराजांच्या सिंधूदुर्ग दौऱ्यावर राणेंची बोचरी टीका

    22-Nov-2023
Total Views | 163

Aditya Thackeray


मुंबई : गुरुवारपासून आदित्य ठाकरे सिंधूदुर्ग दौऱ्यावर जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावर टीका केली आहे. सिंधूदुर्ग तो बहाना है, पेंग्विन को कलाकारोके साथ नाचना है, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.
 
गोव्यात २० ते २८ नोव्हेंबर या कालावधीत फिल्म फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. यातच आता आदित्य ठाकरेही तिथे दौरा करणार आहेत. यावरुनच आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंच्या या दौऱ्यावर बोचरी टीका केली आहे.
 
नितेश राणे म्हणाले की, "त्यांची संघटनाच मुळात खिळीखिळी झालेली आहे. पण मला एक प्रश्न विचारायचा आहे की, खळा़ बैठक आणि आदित्य ठाकरेंचा दौरा आणि गोव्यात फिल्म फेस्टिवल असणं यात आम्हाला साम्य का दिसत आहे," असे ते म्हणाले.
 
तसेच "सिंधूदुर्गवर प्रेम आहे की, गोव्याच्या फिल्म फेस्टिवलमध्ये हजेरी लावायची आहे? की बॉलीवूडच्या कलाकारांसोबत पार्टी करायची आहे? सिंधूदुर्ग तो बहाना है, पेंग्विन को कलाकारोके साथ नाचना है, असा विषय आहे. त्यामुळे याचं उत्तर आम्ही काही दिवसांत गोव्याचे फोटो दाखवून देऊ," अशी टीका नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर केली आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121