बिहारमध्ये हत्याकांड! छठ पुजेवरून परतणाऱ्या एकाच कुटुंबातील ६ जणांवर गोळीबार

    20-Nov-2023
Total Views | 99

Bihar


पाटणा :
बिहारमध्ये नुकताच छठ पुजेचा सण उत्साहात पार पडला. मात्र, यादरम्यान तिथे एक धक्कादायक घटना घडली आहे. छठपूजेवरून परतणाऱ्या एकाच कुटुंबातील सहा जणांवर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून अन्य लोक गंभीर जखमी झाले आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार २० नोव्हेंबर रोजी ही घटना घडली असून आशिष चौधरी असे आरोपीचे नाव आहे. हे प्रकरण लखीसरामधील कबैया पोलीस स्टेशन परिसरातील आहे. येथील पंजाबी वस्तीत राहणारे शशिभूषण झा यांचे कुटुंब सोमवारी छठपूजेनंतर घरी परतत होते. त्यावेळी आशिष नावाच्या तरुणाने त्यांना रस्त्यात अडवत संपुर्ण कुटुंबियांवर गोळीबार केला.
 
यामध्ये शशिभूषण यांची दोन मुले चंदन आणि राजेंद्र हे जागीच ठार झाले आहेत. तर शशिभूषण यांच्यासह त्यांची पत्नी राजनंदन, मुलगी दुर्गा आणि सून लवली हे जखमी झाले आहेत. दरम्यान, जखमींना उपचारासाठी पाटणा येथे हलवण्यात आले आहे. तसेच आरोपी आशिष चौधरी फरार असून त्याचा शोध सुरु आहे.
 
आशिष चौधरी याचे अनेक दिवसांपासून दुर्गासोबत प्रेमसंबंध होते. परंतू, दुर्गाच्या कुटुंबीयांचा लग्न करण्यास नकार होता. त्यामुळे या हल्ल्यामागचे कारण हे प्रेमप्रकरण असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, अचानक झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आशिषवर गुन्हा दाखल केला असून त्याच्या कुटुंबीयांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे.


अग्रलेख
जरुर वाचा
‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘संस्कार भारती’ कोकण प्रांताच्या पुढाकारातून सुरु झालेल्या ’THE ROOTS OPEN MIC ’ या उपक्रमाने आपल्या दोन यशस्वी वर्षांची पूर्तता साजरी केली. ‘सा कला या विमुक्तये’ या मूलमंत्रासोबत विविध कलांच्या अभिव्यक्तीसाठी कार्यरत असलेला हा अनोखा उपक्रम. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी होणार्‍या कार्यक्रमाच्या यंदाच्या सत्रात मातृदिवस आणि समरसतेसारख्या भावनिक विषयांना वाहिलेली सादरीकरणे करण्यात आली. तसेच दि. 20 मे रोजी येणार्‍या थोर कवी सुमित्रानंदन पंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121