मुंबई : न्यूझीलंडविरुध्दच्या सामन्यात श्रेयस अय्यरने वादळी खेळी करत शतक झळकावले. श्रेयस अय्यरने ६७ चेंडूत ८ षटकारांसह ३ चौकारच्या मदतीने वादळी शतक ठोकले. त्याने किवींच्या गोलंदाजीची अक्षरशः पिसे काढल्याचे पाहायला मिळाले, विराट कोहलीला उत्तम साथ देतानाच अय्यरने विराटच्या सोबत १६३ धावांची विक्रमी भागीदारीदेखील केली.
दरम्यान, विराट कोहलीने आजच्या न्यूझीलंडविरुध्दच्या उपांत्य फेरीत १०६ चेंडूत १ षटकारासह ९ चौकारांच्या मदतीने शानदार शतक झळकावत नवा कीर्तीमान आपल्या नावे केला आहे. तर विराटचे हे आतापर्यंतचे ५० वे शतक असून सचिन तेंडूलकरने वनडेत ४९ शतके झळकावली आहेत.