मुंबई : 'गुगल' ही तंत्रज्ञानातील सर्वात मोठी कंपनी असून मोबाईल फोन्सपासून ते अगदी लॅपटॉपपर्यंत युझर्सना काही सर्च करावयाचे असेल तर गुगल उपयुक्त ठरतं. तर याचं गुगलच काम नेमकं कशाप्रकारे चालतं, याविषयी प्रत्येकाच्या मनात नेहमीच एक कुतूहल असतं. या कुतूहलामुळे एखाद्यास गुगलच्या कार्यशैलीविषयी उत्सुकता निर्माण होते. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात तरुणांना नोकरीविषयक अनेक संधी उपलब्ध असतात. परंतु, गुगलमध्ये नोकरी करावयाची असेल तर नेमकं काय करायचं असा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. त्याविषयी जाणून घेऊया.
गुगलमधील कंपनीमध्ये कशाप्रकारच्या नोकऱ्यांच्या संधी मिळतात?
गुगलच्या माध्यमातून तांत्रिक (Technical) आणि (Non-Technical) गैर-तांत्रिक दोन्ही क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी मिळतात. गुगलद्वारे दिला जाणाऱ्या नोकऱ्यांचे पॅकेज हे साधारण लाखो, कोटींमध्ये दिलं जातं. तुम्हाला जर नोकरीविषयक अधिक माहिती जाणून घ्यावयाची असेल तर Google च्या अधिकृत वेबसाइट google.com किंवा https://www.google.com/about/careers/applications/ (Google Careers) ला भेट देऊ शकता.
गुगलअंतर्गत येणाऱ्या टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल जॉब्सबद्दल जाणून घेऊया.
टेक्निकल रोलमध्ये जूनियर सॉफ्टवेयर इंजीनियर, डेटा साइंटिस्ट, यूएक्स डिजाइनर, सॉफ्टवेयर टेस्टर, नेटवर्क इंजीनियर इ. संधी मिळू शकतात.
नॉन-टेक्निकल रोलमध्ये एडमिनिस्ट्रेटिव असिस्टेंट, जूनियर बिजनेस एनालिस्ट, एसईओ स्पेशलिस्ट (SEO Jobs), कॉपीराइटर, अकाउंट मैनेजर इ. नोकरीची संधी मिळते.
तर गुगलमध्ये नोकरी कशी शोधावी? गुगलच्या वेबसाइटवर रिक्त जागा तपासत रहा. जर तुम्हाला गुगलमध्ये इंटर्नशिप किंवा नोकरीचा पूर्वीचा अनुभव असेल, तर तुमच्यासाठी तिथे करिअर करणे सोपे होऊ शकते. गुगल आपल्या जुन्या कर्मचाऱ्यांना विशेषत्वाने प्राधान्य देते.
नोकरीची संधी मिळवायची असेल तर कोणती कौशल्ये असणे आवश्यक ठरते. मुलाखतीची तयारी कशी करावी?- नोकरीच्या वर्णनाबद्दल जाणून घ्या आणि त्यानुसार तुमची कौशल्ये विकसित करा. तुमच्या रेझ्युमेमध्ये लिहिलेला प्रत्येक तपशील काळजीपूर्वक वाचा. मुलाखतीत त्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात.
कौशल्ये विकसित असतील तरच गुगलमध्ये नोकरीची संधी मिळू शकते.
Google मध्ये नोकरी मिळविण्यासाठी केवळ पदवी मदत करणार नाही. पदवी, डिप्लोमा आणि इतर प्रमाणपत्रांसोबतच तुम्हाला तुमच्या कौशल्यांवरही काम करावे लागेल. तुमच्याकडे नेतृत्व, विश्लेषणात्मक विचार, टीमवर्क यासारखी कौशल्ये असणे गरजेचे असते.