केंद्र सरकारचा मोठा निर्णय! प्रजनन पेशी (ह्युमन गॅमेट्स) च्या आयातीवर बंदी
24-Oct-2023
Total Views | 29
नवी दिल्ली : केंद्र सरकारने सोमवार, २३ ऑक्टोबर रोजी ह्युमन गॅमेट्स म्हणजेच प्रजनन पेशींच्या आयातीवर बंदी घातली आहे. याआधी सरकारने २०१५ मध्ये मानवी भ्रूण आयातीवर बंदी घातली होती. त्यानंतर आता प्रजनन पेशींच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे.
परकीय व्यापार महासंचालनालयाने याबाबत एक अधिसुचना जारी केली आहे. यात असिस्टेड रिप्रोडक्टीव्ह टेक्नॉलॉजी (नियमन) कायदा २०२१ आणि सरोगसी (नियमन) कायदा २०२१ नुसार मानवी भ्रूण आणि प्रजनन पेशींची आयात प्रतिबंधित असल्याचे सांगण्यात आले आहे.