प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा

    22-Oct-2023
Total Views | 44

sharad pawar

मुंबई :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रॉब्लेम्स् ऑफ रुपी प्रबंधाला १०० वर्ष पूर्ण झाल्यामुळे यशवंतराव चव्हाण सेंटरला २१ ऑक्टोबरला एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर उपस्थित होते. दरम्यान त्यांच्यात कार्यक्रमानिमित्त भेट झाली.
 
या भेटीमुळे प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीत येण्याबाबत चर्चा झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. यावर शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले, आमच्या इंडिया आघाडीत कुणी सामील होत असेल तर त्याचा आम्हाला आनंदच असेल. पण प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतची बैठक आघाडीत सामील होण्यासाठी नव्हती तसेच ही भेट राजकीय नसल्याचे त्यांनी सांगितले.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121