सुशांत सिंह राजपूत, दिशा सालीयन प्रकरणात कॅव्हेट दाखल करुन अडकले आदित्य ठाकरे!

    21-Oct-2023
Total Views | 1614
 
Aditya Thackeray
 
 
मुंबई : सुशांत सिंह राजपूत, दिशा सालीयन प्रकरणात उबाठा नेते आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार आहेत. आदित्य ठाकरे यांनी हायकोर्टात कॅव्हेट दाखल केलं आहे. या प्रकरणात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आमची बाजू ऐकून घ्यावी अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे. कारण, मूळ याचिकाकर्ते राशिद खान पठाण यांनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत.
 
आदित्य ठाकरे यांनी न्यायालयात सुशांत सिंह राजपूत, दिशा सालीयन प्रकरणात खोटं आरोपपत्र दाखल केल्याचा गंभीर आरोप राशिद खान पठाण यांनी केला आहे. न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. दिशा सालियानच्या मृत्यूचा तपास अजून संपला नाही. दिशाचा मृत्यू ज्या वेळी झाला होता त्यावेळी आदित्य ठाकरे यांचा मोबाईल त्याच परिसरात कसा काय होता? असा सवालही याचिकेतून विचारण्यात आला आहे.
 
आजोबा वारल्याचा आदित्य ठाकरेंचा दावाही खोटा असल्याचं राशिद खान पठाण यांनी केला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी न्यायालयाला खोटी माहिती दिली असून त्यांच्यावर न्यायालयाने कारवाई करावी अशी मागणी राशिद खान पठाण यांनी केला आहे.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121