मुंबई : दिशा सालियान आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरणात उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सर्वेाच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केलं आहे. या प्रकरणात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आमची बाजू ऐकून घ्यावी अशी मागणी आदित्य ठाकरे केली. दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्यावर या प्रकरणी उच्च न्यायालयात एक याचिकाही दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान जुलैमध्ये दिशा सालियान प्रकरणी तपास सुरू झालेला नाही. तसेच एसआयटी स्थापन झालेली नाही. म्हणूनच खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा मिळावी यासाठी एसआयटी स्थापन करावी. अन्यथा खरे गुन्हेगार राणीच्या बागेत, विधानसभेमध्ये दिसतील. म्हणूनच जो पर्यत खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा होत नाही.तोपर्यत दिशा सालियानला न्याय मिळणार नाही, असे विधान आमदार नितेश राणे यांनी केले होते.