कोल्हापुरात तणाव! टिपु सुलतानचे स्टेटस ठेवल्याने हिंदुत्ववादी संघटना आक्रमक!
16-Oct-2023
Total Views | 328
कोल्हापुर : कसबा बावडा परिसरात टिपु सुलतानचे स्टेटस ठेवल्याने हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दुर्गा दौड मार्गावर टिपू सुलतानचे उदात्तीकरण करण्याच्या हेतूने वाक्य लिहिल्याने तणाव निर्माण झाला. त्यामुळे कोल्हापूर पोलिसांनी ते वाक्य पुसून टाकत कारवाई केली आहे. दरम्यान, कोल्हापुर पोलिसांकडुन शांततेचे आवाहन करण्यात येत आहे.
कोल्हापुरात गेल्या तीन दिवसात दुसऱ्यांदा हा प्रकार घडत आहे. कसबा बावड्यात एका तरुणाने टिपू सुलतानचे स्टेटस ठेवल्याने संतप्त जमावाने तरुणाला बेदम मारहाण केली होती. घरावर दगडफेक सुद्धा केली. शाहूपुरी पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक अरुणकुमार सिंदकर यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारवाई केली. स्टेटस ठेवणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करावा, त्याला तत्काळ अटक करावी, अशी मागणी परिसरातील तरुणांनी पोलिसांकडे केली होती.