आदित्य ठाकरेंच्या संबंधित व्यक्तीवर आयकर विभागाचे छापे!
- भाजप नेते किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप
16-Oct-2023
Total Views | 312
मुंबई : कोविड काळातील बीएमसीकडून कंत्राट घेतलेल्या कंपन्या आयकर विभागाच्या रडारवर आहेत. मुंबई, पुणे, गुजरात आणि उत्तर प्रदेशसह १० ठिकाणी छापे मारण्यात आले आहेत. आर्थिक गुन्हे शाखा, ईडीच्या तपासानंतर आता आयकर विभागाकडून छापेमारी सुरू आहे. यात आदित्य ठाकरेंच्या संबंधित व्यक्तीवर आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे. रोमिल छेडा असे त्या व्यक्तीचे नाव आहे.
यावेळी बोलताना भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले, "मुंबई महानगरपालिकेने रोमिल छेडा यांना राणीची बाग “पेंग्विन” चे, कोविड हॉस्पिटल “ऑक्सिजन प्लांट” असे 17 विविध प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट दिले. मुंबई महानगरपालिकेनी ही ह्या कंपनीला ब्लॅक लिस्ट केलं होत, जयपूर हॉस्पिटल (राजस्थान सरकारने) ही ह्या कंपनीला ब्लॅक लिस्ट केलं होत. रु. 138 कोटींचा ऑक्सिजन प्लांट पुरवठा करण्याचे पैसे घेतले आणि फक्त रु. 38 कोटी किंमतीचा ऑक्सिजन प्लांट पुरवठा केला. या संदर्भात केलेल्या तक्रारीनंतर मुंबई पोलिस आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने प्राथमिक चौकशी सुरु केली आहे.काही आठवड्यापूर्वी इडीने सर्चरेड घातल्या होत्या. आज आयकर विभागाने धाडी घातल्याचे कळते." असं सोमय्या म्हणाले.