कुलदीप यादवचा डबल धमाका; शकील, इफ्तिखारला धाडले स्वस्तात माघारी

    14-Oct-2023
Total Views | 21
Indian Spinner Kuldeep Yadav Takes two Wickets

मुंबई :
भारताचा फिरकीपटू चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादवने एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट्स घेत पाकला बॅकफूटवर ढकलले. त्याने सौद शकील, इफ्तिखार अहमद यांना स्वस्तात माघारी धाडले. सौद शकील आणि इफ्तिखार अहमद या दोघांनाही त्रिफळाचित करण्यात यादव यशस्वी झाला.

दरम्यान, या दोघांनाही दुहेरी आकडा गाठता आलेला नाही. याआधी पाकला मोठा धक्का बसला असून पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम फक्त ५० धावा करून बाद झाला. मोहम्मद सिराजने बाबरला क्लिन बोल्ड केले. त्याने ७ चौकारांसह ५८ चेंडूत ५० धावा केल्या. भारत विरुध्द पाकिस्तान यांच्यात अहमदाबाद येथे नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळविण्यात येत आहे. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पाकने प्रथम फलंदाजी करताना अब्दुल्लाह शफिक, इमाम-उल-हक हे दोघे स्वस्तात माघारी परतले. शफिकने २४ चेंडूत २० धावा केल्या तर इमामने ३८ चेंडूत ३६ धावा केल्या.

भारताने गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी स्पेलची सुरुवात केली. ८ व्या षटकात सिराजने शफिकची विकेट घेत पाकला पहिला धक्का दिला. ऑल राऊंडर हार्दिक पांड्याने इमामची विकेट घेत दुसरा धक्का दिला. दरम्यान, भारत विरुध्द पाकिस्तान यांच्यातील सामना म्हणजे क्रिकेटरसिकांसाठी मेजवानी असते.

अग्रलेख
जरुर वाचा
भारतीय जनता पार्टी द्वारे शासकीय दाखले शिबिर संपन्न

भारतीय जनता पार्टी द्वारे शासकीय दाखले शिबिर संपन्न

वसई विरार शहर महापालिका क्षेत्रातील दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विविध शासकीय दाखल्यांची अत्यंत गरज भासत असते. त्यासाठी त्यांना व त्यांच्या पालकांना शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. वसई तहसीलदार ऑफिसला जाणे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शक्य होत नसल्याने ही गैरसोय टाळण्यासाठी भारतीय जनता पक्षाद्वारे वसई तहसील कार्यालयाकडील उत्पन्न दाखले, अधिवास दाखले, क्रिमिलेअर दाखले, ज्येष्ठ नागरिक दाखले, रेशन कार्ड ऑनलाइन करून घेणे अशा विविध कामकाजाचे शिबिर शनिवार १४ जून रोजी कातकरीपाडा, चंदनसार..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121