मुंबईत पीएफआयच्या ठिकाणांवर छापेमारी! वाहिद शेखच्या घरी एनआयएची धडक

    11-Oct-2023
Total Views | 289

NIA


मुंबई :
देशात पीएफआयवर बंदी आणण्यात आली आहे. त्यानंतर आता देशभरात अनेक ठिकाणी पीएफआयच्या संदर्भात छापेमारी करण्यात येत आहे. यातच मुंबईत एनआयएकडून छापेमारी सुरु आहे. यातच आता विक्रोळी पार्क साईट येथील वाहिद शेखच्या घरी एनआयएचे पथक पोहोचले असून त्याच्या घराची चौकशी करण्यात येत आहे.
 
पीएफआयच्या संदर्भात एनआयएने विक्रोळीत छापेमारी सुरु केली आहे. वाहिद शेखवर पीएफआयशी संबंधित संस्थांना मदत करत असल्याचा आरोप आहे. तपासणीसाठी त्याला ताब्यात घेतले जाण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, राजस्थान, तमिळनाडू, दिल्ली याठिकाणीही ही छापेमारी सुरु आहे.
 
७/११ च्या मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यात वाहिद शेखचा संबंध असल्याचे सांगण्यात येत होते. या हल्ल्याप्रकरणी १३ आरोपींना अटक करण्यात आली होते. त्यातील १२ जणांना दोषी ठरवून वाहिद शेखची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा त्याच्या घरावर छापेमारी करण्यात आली आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121