कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते राष्ट्रीय स्टार्टअप दिनी उपक्रमाचा प्रारंभ

    17-Jan-2023
Total Views | 58

मंगलप्रभात लोढा
मुंबई : स्टार्टअप्सना शाश्वत व्यवसाय तयार करण्यात मदत करणे, सुरुवातीच्या टप्प्यातील स्टार्टअप संस्थापकांना व्यवसाय वाढविण्याच्या दृष्टीने मदत करणे अशा विविध उद्दीष्टांच्या अनुषंगाने आज राष्ट्रीय स्टार्टअप दिनी राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र स्टार्टअप अॅक्सेलेरेशन उपक्रमाचा’ प्रारंभ करण्यात आला.

 
मंत्रालयात झालेल्या या कार्यक्रमास कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामास्वामी एन., अर्था – स्कूल ऑफ एंटरप्रेन्योरशिपचे सहसंस्थापक टी. एन. हरी, माणदेशी फाऊंडेशनच्या संस्थापक चेतना गाला, युअर स्टोरी मीडियाच्या संस्थापक श्रद्धा शर्मा, स्टार्टअप एक्स्पर्ट रवी रंजन आदी मान्यवर ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त स्टार्टअप परिसंस्थेतील तज्ञांद्वारे मार्गदर्शन सत्राचेही आयोजन करण्यात आले.

महिला व ग्रामीण भागातील स्टार्टअप्सना प्राधान्य
महाराष्ट्र स्टार्टअप अॅक्सेलेरेशन उपक्रमाचे उद्दीष्ट हे प्रामुख्याने सुरुवातीच्या टप्प्यातील स्टार्टअप संस्थापकांना व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या व्यावहारिक माहिती मिळण्यासाठी मदत करणे, स्टार्टअप्सना शाश्वत व्यवसाय तयार करण्यात मदत करणे हे आहे. या उपक्रमासाठी अंमलबजावणी भागीदार म्हणून “अर्था-स्कूल ऑफ एंटरप्रेन्योरशिप” काम करणार आहे.



सुरुवातीच्या टप्प्यातील स्टार्टअप संस्थापकांसाठी ही संस्था “अर्था स्केल प्रोग्राम” चालवते, ज्याद्वारे स्टार्टअप्सना आर्थिक आणि सामाजिक समृद्धीमध्ये पाठबळ देऊन त्यांच्या उद्योजकीय प्रवासाला गती देण्याचे काम केले जाते. हा उपक्रम महाराष्ट्रातील DPIIT नोंदणीकृत स्टार्टअप्ससाठी ६ महिन्यांचा विस्तृत उपक्रम असणार आहे. यामध्ये मागील एक वर्षात १ कोटी ते १५ कोटी रुपयांदरम्यान उलाढाल असणाऱ्या निवडक २५ स्टार्टअप्सना याचा विशेष फायदा होणार आहे. या उपक्रमाच्या लाभार्थींमध्ये महिला उद्योजक स्टार्टअप व ग्रामीण भागातील स्टार्टअप्सना प्राधान्य दिले जाणार आहे.

 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121