नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर भारताची दिलेली हाक आता प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे. कोरोना सारख्या अत्यंत नव्या आणि कराल आजारावरही भारताने लस शोधली. भारताने तेव्हा जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रमही पूर्णपणे यशस्वी करून दाखवला. आता भारतातील शेतकऱ्यांसमोर नवीनच संकट उभे ठाकले आहे. लम्पी नावाच्या आजाराने देशातील गुरांना ग्रासले असून त्यामुळे त्यांच्या एकूणच सर्वच क्षमतांवर परिणाम होतो आहे. यामुळे देशातील पशुधनाचे खूप मोठे नुकसान होत आहे. याच आजारावर भारतीय शास्त्रद्यांनी उत्तर शोधले असून या आजरावरची लस देखील शोधून काढली आहे. ग्रेटर नोएडा येथे संपन्न झालेल्या वर्ल्ड डेअरी समिट मध्ये पंतप्रधानांनी याबद्दल घोषणा केली.
लम्पी आजारामुळे पशुधनाच्या नुकसानाला आला घालण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. या आजारावर स्वदेशी लसनिर्मितीवर भारतीय शास्त्रद्यांनी भर दिला आहे. २०२५ पर्यंत १०० टक्के प्राण्यांना फुट एंड माउथ डिजीज आणि ब्रुसलॉसिसच्या विरोधातील लस देण्याचे लक्ष निर्धारित करण्यात आल्याचेही पंतप्रधान म्हणाले. केंद्र सरकार आणि विविध राज्यांचे राज्य सरकार हे एकत्रितपणे याबद्दल मोहीम हाती घेणार आहेत आणि भारतीय शेतीला, पशुधनाला वाचवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत असे पंतप्रधांनानी स्पष्ट केले.
भारतातील पशुधन हे भारतीय शेतीचा कणा आहे, भारतात धवलक्रांती झाल्याने भारतातील पोषण मूल्यांची वाढ झाली आणि हा मोथक मैलाचा दगड होता. महाराष्ट्रातही या आजाराचा धोका वाढतो आहे. राज्य सरकार लवकरच या बद्दल मोहीम हाती घेणार आहे पण याबद्दल लवकरच पावले उचलली नाहीत तर गंभीर स्थिती ओढवेल असा इशारा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला आहे.