महाराष्ट्राच्या अविनाश साबळेचा नवा विक्रम, मोदींकडुन झाले कौतुक
07-Aug-2022
Total Views | 77
61
बर्मिंगहॅम : बर्मिंगहॅममध्ये सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत पुरुषाच्या ३ हजार मीटर स्टीपलचेस स्पर्धेत महाराष्ट्राच्या अविनाश साबळेंने रौप्य पदक जिंकले आहे. या विजयानंतर अनेक जण अविनाशवर शुभेच्छाचा वर्षाव करत आहे. या विजयानंतर पंतप्रधान नरेद्र मोदींनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत.
"पंतप्रधान मोदींनी इथं येण्याअगोदर सगळ्या खेळाडूंशी संवाद साधला होता. त्यांनी आम्हाला खूप प्रोत्साहित केले. याआधी टोकियो ऑलंपिकमध्ये भारतीय खेळाडूंना चमकदार कामगिरी करता आली नव्हती. याची खंत मनात होतीच. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धत मी रौप्य पदक जिंकले असले तरी पुढच्या वेळेस मी सुवर्णपदक जिंकण्याचा प्रयत्न करणार" राष्ट्रकुल स्पर्धेला जाण्याआधी मोदींनी सर्व खेळाडु सोबत संवाद साधला होता, यावेळी अविनाश या संवादात म्हणाला.
Avinash Sable is a remarkable youngster. I am delighted he has won the Silver Medal in the men’s 3000m Steeplechase event. Sharing our recent interaction where he spoke about his association with the Army and how he overcame many obstacles. His life journey is very motivating. pic.twitter.com/50FbLInwSm
राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये पुरुषांच्या ३००० मीटर स्टीपलचेस स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी अविनाश साबळे यांचे अभिनंदन केले. यासोबतच मोदी यांनी अविनाश साबळे यांच्याशी झालेल्या संभाषणाचा व्हिडिओही शेअर केला आहे. अविनाश साबळे हा महान युवा खेळाडू आहे. पुरुषांच्या ३००० मीटर स्टीपलचेस स्पर्धेत त्याने रौप्य पदक जिंकले याचा मला खूप आनंद आहे. मी माझे नुकतेच झालेले संभाषण शेअर करत आहे, ज्यात त्यांनी सैन्यासोबतच्या संबंधांबद्दल चर्चा केली आहे. अविनाशने शेवटी अगणित अडथळ्यांवर कशी मात केली हे सांगितले आहे. त्यांचा जीवन प्रवास अत्यंत प्रेरणादायी असल्याचे म्हणत मोदींनी ट्वीट केले आहे.
Young Indian champions are breaking records & turning heads at #Birmingham#CWG. Avinash Sable’s 🥈 in #Steeplechase is momentous. He has shaken the strong grip of the Kenyan 🇰🇪 athletes who have won all the medals in the sport since 1998 & registered a historic win for 🇮🇳 pic.twitter.com/mru9QBu3mr
अविनाश आणि अब्राहम किबीवोट यांच्यात अखेरच्या टप्प्यापर्यंत कमालीची चुरस होती. केनियाच्या दोन धावपटूंना मागे टाकून अविनाशने किबीवोटला गाठले होते. अखेरच्या १०० मीटर अंतरावर मात्र किबीओटने वेग घेत साबळेला मागे टाकले. केवळ दशांश ५ सेकंदाच्या फरकाने अविनाशचे सुवर्णपदक हुकले. किबीवोटने ८ मिनिटे, ११.१५ सेकंद, तर अविनाशने ८ मिनिटे, ११.२० सेकंद अशी वेळ नोंदवली.
स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मोडला
राष्ट्रीय विक्रम मोडणे फार कठीण नसते, हे आपले शब्द अविनाशने शनिवारी राष्ट्रकुल स्पर्धेतही खरे केले. त्याने गेल्या चार वर्षांत नवव्यांदा स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मोडला. त्याने सर्वप्रथम २०१८ मध्ये भुवनेश्वर येथे राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला होता. त्यानंतर यावर्षी मोरोक्कोमध्ये रबाक येथे झालेल्या डायमंड लीगमध्ये अविनाशने ८ मिनिटे, १२.६८ सेकंद असा नवा विक्रम साकारला.