मढच्या स्टुडिओचा वापर तात्काळ थांबवा
27-Aug-2022
Total Views | 39
मुंबई : मालाडच्या मढ परिसरात उभारण्यात आलेल्या स्टुडिओत होणाऱ्या शुटिंग्स आणि इतर सर्व बाबी तात्काळ थांबविण्यात याव्यात, अन्यथा त्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, अशा प्रकारची नोटीस मुंबई महापालिका प्रशासनाच्या देण्यात आली आहे. शुक्रवार, दि. २६ ऑगस्ट रोजी सदरील नोटीस स्टुडिओच्या मालकाला देण्यात आली असून किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांमुळे हे प्रकरण चर्चेत आले होते.
मढ येथे उभारण्यात आलेल्या या स्टुडिओला पर्यावरण विभागाने अटींसह केवळ सहा महिन्यासाठी परवानगी दिली होती. मात्र, काँग्रेस आमदार अस्लम शेख यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी एक हजार कोटी रुपयांचा स्टुडिओ या ठिकाणी उभा राहिल्याचा आरोप किरीट सोमय्यांचा केल्याने या प्रकाराला वेगळे वळण प्राप्त झाले होते.
दरम्यान, शुक्रवार, दि. २६ ऑगस्ट रोजी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यासह भाजप खासदार गोपाळ शेट्टी, आमदार अतुल भातखळकर आणि आमदार योगेश सागर यांनी या स्टुडिओची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी देखील केली आहे.