शिवतीर्थावर दसरा मेळावा उद्धव ठाकरेंचाच! : किशोरी पेडणेकर

    27-Aug-2022
Total Views | 110

Kishori P - Dasara Melava
 
मुंबई : शिवसेना आणि दसरा मेळावा या दोन गोष्टींचं नातं गेली अनेक वर्ष टिकून आहे. दादरच्या शिवाजी पार्क येथे दरवर्षी हा दसरा मेळावा आयोजित केला जातो. राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेकजण याठिकाणी येत असतात. मात्र शिवसेनेत सुरु असलेल्या खडाजंगीमुळे यावर्षीचा दसरा मेळावा कोण घेणार? याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागून आहे. अशातच "दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंचाच दसरा मेळावा होणार आणि महापालिकेला त्याबाबत भूमिका स्पष्ट करावीच लागेल.", असे मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर शनिवारी (२७ ऑगस्ट) पत्रकारांशी बोलत असताना म्हणाल्या.
 
"दरवर्षी साधारण पाच ते सहा कार्यक्रमांना परवानगी दिली जाते. गेली ५६ वर्ष शिवसेना शिवतीर्थावर दसरा मेळावा घेत आहे. त्यामुळे हा रेकॉर्ड कोणीही पुसू शकत नाही. शिवसेना कोणाची याबाबत कोर्टात सुरु असलेल्या लढ्याशी पालिकेचा काही संबंध नाही. त्यामुळे कोणाच्याही दबावाखाली न येता पालिकेने याही वर्षी परवानगी दिलीच पाहिजे.", असे किशोरी पेडणेकर यांचे म्हणणे आहे.

स्थानिक आमदार म्हणून सदा सरवणकर दरवर्षी दसरा मेळाव्यासाठी अर्ज करतात. मात्र यावेळी त्यासंबंधी कुठलेही पत्र त्यांनी अद्याप पाठवलेलं नाही. यावर "सदा सरवणकर यांनी यात आडकाठी घेऊ नये. त्यांनी अशाप्रकारचे कुठलेही दळभदरी काम करू नये ज्याने मुंबईकर नाराज होईल. ", अशी प्रतिक्रिया पेडणेकर यांनी दिली. त्यामुळे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा आता पुढचा वारसदार कोण? अशी चर्चा सध्या होताना दिसत आहे.
.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121