संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतल्याने सकाळचा भोंगा शांत झाला, असे म्हणत राऊतांच्या विरोधकांनी आनंद व्यक्त केलाय. कारण राऊत जरा फाटक्या तोंडचेच आहेत, मागे एक पत्रकार परिषद घेऊन त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना जाहीरपणे शिव्या घातल्या होत्या, त्यावेळी एका वृत्तपत्राच्या संपादकाला हे शोभत का ? असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राऊतांचा समाचार घेतला होता. दुसरीकडे जेलमध्ये राऊतांच्या सोबतीला नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे राष्ट्रवादीचे दोन बडे नेते आहेत, त्यामुळे सध्या महाराष्ट्राला एक गहन प्रश्न पडलाय तो म्हणजे अनिल देशमुख, नवाब मलिक आणि संजय राऊत सध्या काय करतात?
देशमुख, मलिक आणि राऊतांचा जेलमधील दिनक्रम -
पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत,आर्थिक गैर व्यवहार प्रकरणी अनिल देशमुख आणि मनी लॉड्रीगप्रकरणी नवाब मलिक हे राज्यातील तीन मोठे नेते सध्या मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात आहेत. बहुचर्चित प्रकरणांतील आरोपी विशेष कैदी म्हणून गणले जात असल्याने या तिघांना विशेष कैदी म्हणून वागवले जात आहे. त्यामुळे विशेष कैदी असल्याने कारणाने या तिघांना बाकीच्या कैद्यांप्रमाणे सामान्य बराकीऐवजी १० बाय १० आकाराच्या स्वतंत्र खोल्यांमध्ये ठेवण्यात आले आहे.
या खोल्यांत पंखा, स्वतंत्र स्वच्छतागृहाची व्यवस्था असते. तुम्हाला आठवत असेल तर मागे राऊत यांनी आपल्यांना व्हेंटीलेशन नसलेल्या खोलीत ठेवल्याची तक्रार माननीय न्यायालयाकडे केली होती त्यावर न्यायालयाने त्यांना खिडकी असलेल्या खोलीत ठेवा असा आदेश देखील दिला होता. सध्या हे तिघेही या रूममध्ये असल्याने तसेच अन्य कुणी कैदी त्यांचा सोबत नसल्याने त्यांना एकांतातच दिवस काढावे लागतात. फक्त जेवणाच्या वेळी सर्व कच्च्या कोठडीतील कैद्यांना बराकीबाहेर येण्याची मुभा असते. त्याप्रमाणे देशमुख,मलिक आणि राऊत हे तिघे त्यावेळी बाहेर येतात.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि हे तिघे भेटतात कि नाही -
सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार राऊत मलिक आणि देशमुख हे जेल मध्ये एकत्र भेटतात आणि गप्पा मारतात अशी माहिती मिळते. खर तर हे सांगण्यासाठी सूत्रांची गरजच नाही कारण महाविकास आघाडीमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे चांगलेच गुळपीठ जमले होते त्यात हे तिघेही समदुखी असल्याने त्यांच्या चांगल्याच चर्चा झडत असणार यात वाद नाही. आता मुद्दा उपस्थित होतो तो म्हणजे देशमुख मलिक आणि राऊत यांच्यातील चर्चेचा विषय काय असेल? ते तुम्हीच आम्हाला कमेंट करून कळवा.
जेलमध्ये राऊत देशमुख आणि मालिकांना काय करावे लागते -
जेलच्या नियमानुसार सकाळी ६ वाजता सर्व कैदी उठतात. त्याप्रमाणे हे राऊत देशमुख आणि मालिकांना या नियमाचे पालन करावे लागते. पुढे सकाळी साडेसात वाजेपर्यंत नाष्टा घेण्यासाठी तयार हे तिघेही तयार होतात. साडेसात वाजता सर्व बराकी उघडल्या जातात. मग सगळे कैदी आपापला नाष्टा घेऊन बराकीत जातात. ९ वाजता कारागृह अधीक्षकांची संचारफेरी होते. या फेरीदरम्यान सर्व कैद्यांना आपापले हिस्ट्री कार्ड समोर धरून उभे राहावे लागते. संजय राऊत, नवाब मलिक, अनिल देशमुख यांनाही हे कार्ड घेऊन उभे राहावे लागते. या कार्डवर गुन्ह्याचा तपशील लिहिलेला असतो.
राऊतसुद्धा वर्क फ्रोम जेल करतात का? -
मागे एकदा तत्कालीन विरोधीपक्षनेते आणि साध्यचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतके दिवस ‘वर्क फ्रॉम होम’ माहिती होते. पण, या सरकारच्या म्हणजेच ठाकरे सरकारच्या काळात बिनखात्याचे मंत्री नवाब मलिक यांच्या कृपेने ‘वर्क फ्रॉम जेल’ पाहायला मिळाले. अशी महाविकास आघाडी किंवा ठाकरे सरकारवर टीका केली होती. सध्या संजय राऊत हे जेल मध्ये आहेत काही दिवसांपूर्वी त्यांनी जेलमधून कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिले होते.
पण नेहमीच वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेले राऊत पुन्हा चर्चेत आले ते शिवसेनेच्या मुखपत्रातील त्यांच्या रोक ठोक या सदरासाठी राऊत जर कोठडीत असतील तर त्यांचा कॉलम कसा काय छापून आला असा प्रश्न ईडीच्या अधिकाऱ्यांना पडला आणि सध्या संजय राऊत जेलमधून कोणताही कॉलम लिहू शकत नाहीत कोर्टाकडून त्यांनी अशी कोणतीही परवानगी मागितलेली नाही वा तशी त्यांना परवानगी मिळालेली नाही त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होणार असल्याचे सांगितले जाते.
ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात एकाच वेळी तीन बडे राजकीय नेते एकाच कारागृहात कोठडीमध्ये असण्याची ही बहुधा इतिहासातील पहिलीच वेळ असेल. त्यामुळे अनिल देशमुख,नवाब मलिक आणि संजय राऊत यांच्या साथील आणखीन एखादा नेता कोठडीत जातो कि हे तिघे बाहेर येतात हे भविष्य काळात समजेलच.