कसं असेल शिंदेंच्या स्वप्नातील प्रतिसेना भवन?

    12-Aug-2022
Total Views | 107

shivsena
 
 
 
मुंबई : उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वविरोधात उठाव केल्यानंतर सुरु झालेल्या एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे संघर्ष अजूनच तीव्र होत चालला आहे. खरी शिवसेना कोणाची या वादात आता शिवसेना भवनाचा वादही पेटला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी फारकत झाल्याने त्यांच्या शिवसेना भवनाला शिंदे गटाकडून प्रति शिवसेना भवन उभारून उत्तर दिले जाणार आहे. ज्या दादर मतदारसंघात उद्दाहव ठाकरेंचे शिवसेना भवन आहे त्याच दादर मतदारसंघात शिंदेचेही शिवसेनाभवन असणार आहे. शिंदे गटाचे माहीम मतदारसांघाचे आमदार सदा सरवणकर यांनी याबद्दल माहिती दिली आहे.
 
 
शिंदे गटाकडून या नवीन कार्यालयाला प्रति शिवसेनाभवन हे एक सुसज्ज असे कार्यालय असेल जिथे सर्वसामान्य नागरिकांना त्यांचे प्रश्न घेऊन येता येईल आणि एकनाथ शिंदे त्या समस्यांचे निराकरण करतील. येत्या १० -१५ दिवसांतच हे कार्यालय उभारले जाणार आहे. तशी घोषणाही सदा सरवणकर यांनी केली आहे. शिंदे यांच्या या कार्यालयाला थेट प्रति शिवसेना भवन म्हणण्याचे शिंदे गटाने टाळले असले तरी शिवसेनेवरचा आपला दावा अजून मजबूत करण्यासाठीच एकनाथ शिंदेंनी ही खेळी खेळली असल्याचे म्हटले जात आहे.
 
शिंदे गटाच्या या प्रति शिवसेनाभवनावर टीका करताना खा. अरविंद सावंत यांनी हे फक्त आमदार - खासदारांचे शिवसेना भवन असेल असे म्हटले आहे. त्याला प्रत्युत्तर देताना शिवसेना भवन ही कोणाच्याही मक्तेदारी नाही, आमचे कार्यालय हे कोणाच्याही मालकीचे नसून हे लोकांचे, सामान्य माणसांचे शिवसेना भवन असणार आहे, जिथे सर्वसामान्यांना थेट मुख्यमंत्र्यांशी बोलता येईल आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करता येईल. अशी प्रतिक्रिया सदा सर्वांकरांनी दिली.
 
 
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121