शुक्रवारी मुंबईत २ हजार, २५५ ‘कोरोना’बाधित

    18-Jun-2022
Total Views | 44


corona 2
 
 
 
 
 
मुंबई : मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने होणारी वाढ आणि घट शुक्रवारीही कायम राहिल्याचे दिसून आले. मुंबई महापालिका प्रशासनाच्यावतीने शुक्रवार, दि. १७ जून रोजी देण्यात आलेल्या माहितीनुसार, महापालिका क्षेत्रात २ हजार, २५५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. दिवसभरात तब्बल १,९५४ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १० लाख, ५७ हजार, ६१९ इतकी झाली आहे. शुक्रवारी नोंदवण्यात आलेल्या दोन कोरोनाबाधितांच्या मृत्यूमुळे मुंबईतील कोरोनामृत्यूंची आकडेवारी १९ हजार, ५८० वर पोहोचली आहे.
 
 
 
शुक्रवारी ऑक्सिजन बेडवर उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या : १६
 
उपलब्ध आयसीयू बेड्सची संख्या : १५०८
 
उपलब्ध व्हेंटीलेटर्सची संख्या : ८०९
 
उपलब्ध ऑक्सिजन बेडची संख्या : ४७३९
 
मुंबईतील एकूण चाचण्या : १,७३,५८,४४६
 
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121