विरारमध्ये ‘सावरकर : एक झंझावात’ विषयावर व्याख्यान

    29-May-2022
Total Views | 53
 
 
veer savarkar
 
 
विरार : शनिवार, दि. २८ मे रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून दै. ‘मुंबई तरुण भारत’द्वारे दरवर्षी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर आधारित ‘कालजयी सावरकर’ विशेषांकाचे प्रकाशन करण्यात येते. विरारमध्येही ‘कालजयी सावरकर’ विशेषांकाचे प्रकाशन करण्यात येणार असून, विशेषांक प्रकाशन कार्यक्रम विरारमधील ‘धीमही बँक्वेट हॉल’, पहिला माळा, बीएपीएस, स्वामी नारायण मंदिराजवळ, जुना विवा कॉलेज रोड येथे आयोजित करण्यात आला आहे.
 
‘कालजयी सावरकर’ विशेषांकाचे प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वसई जिल्हा संघचालक नरेंद्र पितळे आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. हेमंत जोशी यांच्या हस्ते रविवार, दि. २९ मे रोजी सायंकाळी ५ वाजता करण्यात येणार आहे. यावेळी प्रख्यात वक्ते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचे ‘सावरकर : एक झंझावात’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून करण्यात आले आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121