मुंबई : काश्मीरी हिंदूंच्या नरसंहाराच्या सत्य घटनेवर आधारित ‘द काश्मीर फाईल्स’च्या यशानंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. विवेक अग्निहोत्री यांचा नवीन चित्रपट १९८४ मध्ये झालेल्या शीखविरोधी दंगलींच्या वास्तविक घटनांवर आधारित असेल.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते अग्निहोत्रींनी कायम अशाच विषयांवर कलाकृती निर्माण करतात. समाजापुढे सत्य घटनांची न कळलेली बाजू पुढे आणण्याचे काम केले आहे. 'द ताश्कंद फाईल्स', 'द काश्मीर फाईल्स' आणि त्यानंतर आता 'द दिल्ली फाईल्स'ची घोषणा करण्यात येणार आहे.
'द ताश्कंद फाईल्स' हा चित्रपट भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या आकस्मिक निधनावर आधारित होता. तर काश्मीर खोऱ्यातील नरसंहारावर आधारित 'द काश्मीर फाईल्स', या चित्रपटांच्या यशानंतर झालेली ही घोषणा प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहेत. ११ मार्च २०२२ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या काश्मीर फाइल्सने बॉक्स ऑफिसवर उत्कृष्ट कामगिरी केली आणि महामारीनंतरच्या काळातील सर्वात यशस्वी चित्रपट ठरला.
द दिल्ली फाईल्स हा चित्रपट १९८४ मध्ये झालेल्या शीखविरोधी दंगलींच्या वास्तविक घटनांवर आधारित असेल. नवी दिल्लीत ३०००हून अधिक निष्पाप शिखांच्या हत्या आणि देशभरातील ४०शहरांमध्ये अंदाजे ८०००-१७००० शीखांच्या हत्या करण्यात आला.
भारताच्या इतिहासातील सर्वात काळ्या दिवसांपैकी एक आहे जिथे शीख बांधवाना लक्ष्य करण्यात आले आणि समुदायाच्या हत्यांची मालिका झाली. हल्लेखोरांनी लोखंडी रॉड, क्लब, पेट्रोल, डिझेल घेऊन शीख वस्तीत घुसून त्यांना ठार मारले. १९८० च्या दशकात भारतापासून स्वातंत्र्य मागणाऱ्या सशस्त्र फुटीरवादी खलिस्तान चळवळीमुळे पंजाबमध्ये हिंसाचार सुरूच होता. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या आगामी ‘दिल्ली फाईल्स’ चित्रपटाची सर्वच वाट बघत आहेत. तसेच अनेक कलाकारांनी ट्वीट करून या चित्रपटासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.