मुंबई : भाजपने ४ राज्यांतील निवडणुकांमध्ये बाजी मारली. हे यश पाहता कॉंग्रेसचे मंत्री असलम शेख यांनी, "भाजपला चांगले यश मिळाले, आता त्यांनी देशहिताचे काम करावे," असे म्हणत टोला लगावला. यावर भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांनी त्यांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. "उत्तर प्रदेशबद्दल ज्ञान देऊ नका, मालवणीतील हिंदूंचे उत्पीडन कधी थांबणार सांगा." असे म्हणत त्यांच्यावर टीका केली.
भाजयुमोचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांनी ट्विट करत म्हंटले की, "असलम शेख, भाजपच्या प्रत्येक राज्यात विकास होत आहे. नागरीका मेट्रोची सफर करत आहेत. पण, तुमच्या कार्यकाळात मालाडची जनता मात्र त्रस्त आहे. मालवणीमध्ये हिंदूंचा छळ होत आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशबद्दल ज्ञान देऊ नका. मालवणीतील हिंदूंचे उत्पीडन कधी थांबणार सांगा." असा सवाल त्यांनी केला आहे.