खादी ग्रामोद्योग मंडळ सभापतीपदी रवींद्र साठेंची निवड

    29-Nov-2022
Total Views | 436


Election of Ravindra Sathe
 
 
 
 
 
मुंबई : खादी आणि ग्रामोद्योगांना आर्थिक उत्तेजना देण्यासाठी स्थापना करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या सभापतीपदी रवींद्र साठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात घोषणा केली आहे.
 
 
 
रवींद्र साठे हे राजकीय क्षेत्रातील मंडळींना प्रशिक्षित करणार्‍या उत्तन येथील ’रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’चे महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या नियुक्तीबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले असून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छादेखील दिल्या आहेत.

 

 
 
कार्यक्रम समन्वयक ते महासंचालक

 

 
रवींद्र साठे हे १९९२ पासून ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’त कार्यरत असून कार्यक्रम समन्वयक, कार्यक्रम संचालक, कार्यकारी संचालक पदापासून सुरु झालेला त्यांचा प्रवास प्रबोधिनीच्या महासंचालकपदापर्यंत येऊन ठेपला होता.
 
 
 
राज्य सरकारच्या खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या सभापतीपदी त्यांची नियुक्ती होणे आनंदाची बाब असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121