पंढरपूर कॉरिडॉरसाठी ३०० कोटींचा निधी मंजूर

    29-Oct-2022
Total Views | 112
 
 
pandharpur
 
मुंबई : कशी विश्वेश्वराच्या कॉरिडॉर नंतर पंढरपूर देवस्थानाजवळही कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे. या कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्यासाठी ३०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. यंदाच्या चालू आर्थिक वर्षात हा टप्पा पूर्ण करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शुक्रवारी मुंबईत दिली.
 
उत्तर प्रदेशात काशी विश्वानाथ कॉरिडॉर व त्यानंतर मध्य प्रदेशातील उज्जैन येथे महाकाल कॉरिडॉर प्रकल्प चालूय आहेत. त्याच धर्तीवर पंढरपूर येथे सुद्धा वारकऱ्यांसाठी भव्य कॉरिडॉर स्थापन करण्यात येणार असल्याचे समजते. पंढरीचा चेहरामोहरा बदलून जाईल. वारकऱ्यांना चांगल्या उच्च दर्जाच्या सोयीसुविधा मिळतील; तसेच जगाच्या नकाशावर विठ्ठलनगरी येईल,' असा विश्वास लोढा यांनी व्यक्त केला.
 
फक्त वारीच्या वेळी नाही तर इतरही दिवशी पंढरीत भक्तांची ये जा चालू असते. 'सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरला आषाढी एकादशी, अन्य सणांच्या दिवशी आणि इतर दिवशीही मोठ्या संख्येने वारकरी येतात. वर्षातून कार्तिकी, आषाढी अशा दोन वाऱ्या येथे होतात. पंढरपुरात सध्या पायाभूत सोयी-सुविधांची कमतरता आहे. नवा कॉरिडॉर झाल्यानंतर यात मोठा फरक पडेल. याशिवाय या कॉरिडॉरमुळे राज्यात धार्मिक पर्यटनाला आणखी चालना मिळेल,' असे लोढा यांनी यावेळी म्हंटले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121