पीड़ परायी जाणे रे !; काशी विश्वनाथाच्या सेवेकऱ्यांना पंतप्रधानांनी पाठविली जुटची पादत्राणे

पंतप्रधानांची संवेदनशीलता

    10-Jan-2022
Total Views |
kvv

जुटची पादत्राणे परिधान केलेले सेवेकरी
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : काशी विश्वनाथ धाम परिसरात चामडे अथवा रबराची पादत्राणे वापरण्यास मनाई आहे. त्यामुळे तेथे चपलांशिवाय काम करणाऱ्या सर्व सेवेकऱ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास जुटची पादत्राणे पाठविली आहेत. त्यामुळे सेवेकऱ्यांच्या पावलांचे थंडीपासून संरक्षण होणार आहे.
 
 
भव्यदिव्य अशी काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरचे लोकार्पण नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या भव्य काशी विश्वनाथ धामामध्ये पुजारी, सेवेकरी, सुरक्षा रक्षक असे शेकडो कर्मचारी दररोज कार्यरत असतात. परिसराची साफसफाई ठेवणे, व्यवस्था राखणे आणि सुरक्षा व्यवस्था पुरविणे यासाठी शेकडो जण डोळ्यात तेल घालून कार्यरत असतात.
 
 
kv 
 
मात्र, धार्मिक कारणामुळे काशी विश्वनाथ धाम परिसरामत चामड्याची अथवा रबराची पादत्राणे वापरली जात नाहीत. त्यामुळे भर थंडीतही पुजारी, कर्मचारी आणि सुरक्षा दले यांना चपला अथवा बुटांशिवायच काम करावे लागत होते. त्यामुळे बऱ्याच अडचणीदेखील निर्माण होत होत्या. या प्रकाराची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाली. त्यांनी तातडीने त्यावर तोडगा काढला आणि मंदिर परिसरात वापरता येतील अशा जुटच्या पर्यावरणपूरक चपलांचे जोड खास दिल्लीहून पाठविले. त्यामुळे आता काशी विश्वनाथाचे पुजारी, सेवेकरी आणि सुरक्षा दलांना त्याचा मोठा लाभ होणार आहे. पंतप्रधानांच्या या संवेदनशीलतेमुळे काशी विश्वनाथाचे सर्व सेवेकरीही भारावले आहेत.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121