नवी दिल्ली : 'अॅपल' हे जागतिक स्तरावरील सर्वात मोठी कंपनी असून परदेशासहित भारतातदेखील अॅपलचे आयफोन, कॉम्पुटर आणि विविध अशी साधने आहेत जी थेट इंटरनेटशी कनेक्ट आहेत. या कंपनीचे सर्वर सर्वात सुरक्षित असल्याचा दावा कंपनीकडून केला जातो. मात्र, लॉस एंजेलिसमध्ये आय क्लाऊड हॅक करत तब्बल ६ लाखाहून अधिक फोटो चोरी झाले असल्याची माहिती देण्यात येत आहे.
लॉस एंजेलिसमध्ये एका व्यक्तीने तब्बल हजारो जणांचे अॅपल आय क्लाऊड हॅक करून खासगी फोटो आणि व्हिडीओ चोरले. तेथील स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, ला पुएन्टे येथे राहणारा अपराधी हाओ कुओ ची याने सर्व गुन्हे मान्य केले आहेत. त्याने काबुल केले आहे की, तो 'icloudripper4you' या नावाने ऑनलाइन भेटत असे. त्याने न्यायालयात हे काबुल केले की तो आणि त्याचे काही सहकारी युझर्सशी बोलताना परदेशी एन्क्रिप्टेड ईमेल सेवेचा वापर करत त्यांच्या आय क्लाऊडमधील सर्व डेटा चोरी करत असे. हे प्रकरण बाहेर आल्यानंतर कंपनीला ग्राहकांच्या टीकेचा सामना करवा लागला.