काँग्रेस बिलकुल जातीयवादी पक्ष नाही : बाळासाहेब थोरात

    28-Jun-2021
Total Views |

congress_1  H x



मुंबई :
राज्यातील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. अशातच भाजपने राज्यव्यापी आंदोलन केले. यानंतर झालेल्या ओबीसी चिंतन मंथन बैठकीत काँग्रेसचे नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मी ओबीसी असल्यानेच मला महसूल ऐवजी हे खातं मिळालं असे वक्तव्य केले. यावर काँग्रेसचे ज्येष्ठ्य नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत स्पष्टीकरण दिले.

यावेळी थोरात म्हणतात,"काँग्रेस जातीयवादी पक्ष नाही. सगळ्यांना एकत्र घेऊन जाणारा पक्ष आहे. विजय वड्डेटीवार यांना काही तरी वेगळं बोलायचं असेल. काँग्रेसने वसंतराव नाईक यांना मुख्यमंत्री बनवलं. बॅरिस्टर अंतुले यांना संधी काँग्रेसने दिली. वड्डेटीवार यांचं वय पाहिलं तर त्यांना मोठी संधी पुढच्या काळात मिळेल,थोडी वाट पाहावी लागेल."
दरम्यान लोणावळ्यात झालेल्या चिंतन-मंथन बैठकीत सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांचा सहभाग होता. या बैठकीत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली. ओबीसी असल्यामुळे महसूल खात्यापासून वंचित राहिलो, असं ते म्हणाले होते. "महाराष्ट्रात ३ दिवस फिरलो, तरी २५ लाखांची सभा होईल. झुकती है दुनिया झुकाने वाले चाहिये. मला ओबीसीचं खातं भेटलं तेव्हा चपरासी देखील नव्हता. मी उधारीवर हे खातं चालवतो. समाज कल्याणच्या भरवशावर ओबीसी खातं चालवतोय. ओबीसी खात्यात जागा भरण्यासाठी पैसे नाही म्हणतात. कार्यालयालाही जागा नाही. काही दिवस रुसलो होतो, मग वाटलं चुकी झाली. विरोधी पक्ष नेता होतो. ओबीसीचं नेतृत्व करतो. मला वाटलं महसूल खातं मिळेल, पण हे खातं भेटले. कारण मी ओबीसी आहे ना.पंकजा मुंडे यांनाही ग्रामविकास खातं भेटलं होतं. निवडणुका झाल्या, कोरोना वाढला तर निवडणूक आयोगाला जबाबदार धरा. गरज भासल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. हे मी मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे" असेही ते म्हणाले.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121