कल्याण डोंबिवलीत सोमवार पासून कोविड निर्बंध शिथील होणार

    19-Jun-2021
Total Views | 58
 
 
 


kdmc_1  H x W:
 
 
 

कल्याण : कल्याण डोंबिवलीत कोविड रुग्णांची संख्या कमी होत असल्याने कडोंमपाचा कोविड र्निबधमध्ये लेव्हल 3 मधून लेव्हल 2 मध्ये समावेश झाला आहे. त्यामुळे कडोंमपा हद्दीतील काही र्निबध शिथील करण्यात आले असून त्यांची अंमलबजावणी 21 जून पासून केली जाणार आहे. यामुळे नागरिक, व्यापारी या सर्वानाच दिलासा मिळाला आहे. कोविड र्निबधाच्या लेव्हल दोनचे नवीन आदेश कडोंमपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जाहीर केले आहेत.
 

कल्याण डोंबिवलीत गेल्या दोन आठवडय़ापासून कोविड रूग्णांची संख्या कमी झाली होती. पण कोविड र्निबधामध्ये शिथील करण्याच्या निकषांच्या बॉर्डरवर कडोंमपा क्षेत्र होते. त्यामुळे मागील आठवडयात निर्बध तीन चे नियम कडोंमपा क्षेत्रत पाळण्यात आले होते. या आठवडय़ात कोविड रुग्णांची संख्या कमी झाल्याने कल्याण डोंबिवलीचा लेव्हल दोन मध्ये समावेश करण्यात आला आहे. या नवीन नियमानुसार दुकाने आणि अत्यावश्यक सेवेतील आस्थापना नियमितपणो सुरू राहणार आहेत. अत्यावश्यक सेवेत नसलेली कार्यालये ही नियमितपणो सुरू राहतील. मॉल्स, थिएटर, 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. रेस्टारंट ही 50 टक्के क्षमतेने सुरू राहण्यास परवानगी दिली आहे. लोकल ट्रेन केवळ अत्यावश्यक आणि वैद्यकीय सेवेसाठी खुली आहे. लग्नसमारंभ सभागृहाच्या 50 टक्के क्षमतेने किंवा जास्तीत जास्त 100 लोकांना परवानगी दिली आहे. अत्यंविधीसाठी उपस्थितीचे कोणतेही बंधन नाही. ही नियमावली 21 ते 27 जून या कालवधीसाठी लागू करण्यात आली आहे.
 
 
------------------------------------------------------------
अग्रलेख
जरुर वाचा
पुणे, चंद्रपूर, नंदुरबार, धाराशीव जिल्ह्यात उबाठा गटाला खिंडार

पुणे, चंद्रपूर, नंदुरबार, धाराशीव जिल्ह्यात उबाठा गटाला खिंडार

शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाने प्रभावित होत आज महाराष्ट्रातील पुणे, चंद्रपूर, नंदुरबार आणि धाराशीव जिल्ह्यातील उबाठा पक्षाच्या माजी नी आज शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे या चार जिल्ह्यांत उबाठा गटाला खिंडार पडले आहे. तसेच मध्य प्रदेशातील जबलपूर, विदीशा या जिल्ह्यांमधील उबाठा पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेतला. मुंबईत आयोजित पक्ष प्रवेश सोहळ्याला मंत्री उदय सामंत, विधान परिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, माजी आमदार ज्ञानराज चौगुले..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121