नवी दिल्ली : उत्तर प्रदेश सरकारने सेवानिवृत्त न्यायाधीश सुरेंद्रकुमार यादव यांची राज्याच्या उप लोकायुक्तपदी नेमणूक केली आहे. राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी त्यांना नुकतीच पद आणि गोपनियतेची शपथ दिली.
लखनऊस्थित विशेष न्यायालयाचे न्यायाधीश असलेल्या सुरेंद्रकुमार यादव यांनी अयोध्येतील बाबरी ढाँचा विध्वंस प्रकरणाची सुनावणी केली होती. त्यानंतर सप्टेंबर २०१९ मध्ये सुरेंद्रकुमार यादव सेवानिवृत्तही झाले होते. यादव यांची पाच वर्षांपूर्वी बाबरी प्रकरणात विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. २०१९ साली सुरेंद्रकुमार न्यायाधीश पदावरून निवृत्त होणार होते. परंतु, प्रकरणाची संवेदनशीलता ध्यानात घेता सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांना ११ महिन्यांची अतिरिक्त वेळ देण्यात आली होती. सोबतच त्यांची बदलीही टाळण्यात आली होती.