चिंता नको! आधार-पॅन 'लिंक' करण्याची मुदत वाढली

    01-Apr-2021
Total Views | 80
 

Adhar _1  H x W
 


नवी दिल्ली : केंद्र सरकारने पॅन कार्डधारकांना आधार कार्ड लिंक करण्यासंदर्भातील निर्णयात दिलासा दिला आहे. नव्या नियमावलीनुसार, ३० जून, २०२१ ही नवी मुदत वाढवण्यात आली आहे. आयकर विभागाच्या नव्या निर्देशानुसार, जर आधार कार्ड-पॅन कार्डशी लिंक केले नाही, तर ते रद्द ठरवण्यात येणार आहे.
 
 
बुधवार, ३१ मार्च ही पॅन-आधार लिंक करण्याची शेवटची तारीख होती. जी आता वाढवून ३० जून, २०२१ करण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांनी आधार-पॅन लिंक केली नाही, त्यांना हा दिलासा मानला जात आहे. जर आधार-पॅनशी लिंक केली नाही तर पॅन-कार्ड 'Inactive' होणार आहे. आयकऱ विभाग अॅक्ट अंतर्गत '२७२ ब' अंतर्गत दहा हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121