नवी दिल्ली : भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये गेली ४० वर्ष कार्यरत असलेल्या सुपरस्टार रजनीकांत यांना ५१वा 'दादासाहेब फाळके पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही घोषणा केली. हा पुरस्कार ३ मे रोजी रजनीकांत यांचा प्रदान करण्यात येणार आहे.
" 'दादासाहेब फाळके पुरस्कार' आतापर्यंत चित्रपटातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ५० कलाकारांना देण्यात आला आहे. आता ५१वा पुरस्कार सुपरस्टार रजनीकांत यांना देण्यात येणार आहे. रजनीकांत यांची या पुरस्कारासाठी निवड केल्यामुळे देशाला नक्कीच आनंद होईल," असे प्रकाश जावडेकर यांनी सांगितले आहे.