
पुणे : पुणे शहरातील नागरिकांचे आता पुणे मेट्रोचे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार आहे असं म्हणावयास हरकत नाही; कारण पुणे मेट्रो बांधकामाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी संभाव्य तफावत निधीस ( वीजीएफ) (VGF) आणि पुणे मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि देशाच्या अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतीच अंतिम मान्यता दिली आहे . या बद्दल ट्विट करून भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कडून आभार मानण्यात आले. या वेळी चंद्रकांत दादा पाटील म्हणाले कि,'' राज्यात भाजपाचे सरकार असताना पुणे मेट्रोची योजना आखण्यात आली होती आणि लगेच या पुणे मेट्रोच्या बांधकामाला मंजुरी देखील मिळाली . या पुणे मेट्रोच्या सर्व प्रयत्नांना केंद्र सरकार तर्फे उत्तम सहकार्य लाभले आहे. आता पण वीजीएफ ला त्वरित मान्यता देऊन पुणे मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याचे काम येत्या साडेतीन वर्षात पूर्ण होण्यास मदत होणार आहे. या पुणे मेट्रोच्या प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक समस्या देखील मोठ्या प्रमाणात सुटायला मदत होईल''. या वेळी चंद्रकांत पाटील यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि राज्याचे विद्यमान विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुणे मेट्रोच्या कामास गती दिल्याबद्दल आभार मांनले.