मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर बंदूक दाखवणाऱ्या आरोपींना जामीन

    31-Jan-2021
Total Views | 229

Mumbai Pune_1  
रायगड : शनिवारी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी एका गाडीतून काहीजण बंदुकीचा धाक दाखवत मार्ग काढण्यारयांचा एक व्हिडियो शेअर केला होता. हा व्हिडियो समोर येताच भाजप नेत्यांनी राह्य सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली. कारण, त्या गाडीवर शिवसेनेची निशाणी असलेला लोगो होता. संध्याकाळ पर्यंत त्या २ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. मात्र, आता त्यांना जामीन देण्यात आल्याची माहिती देण्यात येत आहे.
 
 
 
मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर ट्राफिकमध्ये मार्ग काढण्यासाठी गाडीमधून बंदुकीचा धाक दाखवत आरोपी विकास गजानन कांबळे आणि विजय प्रकाश सीताराम मिश्रा यांनी मार्ग काढला. मात्र, या सर्व घटनेचे चित्रीकरण वायरल झाल्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. खालापूर न्यायालया पुढे हजर केले असता एका बंदुकीचे अधिकृत लायसन असल्याची कबुली दिली. तर, दुसरे बंदूक नसून त्या आकाराचे लायटर असल्याची माहिती आरोपींनी दिली. यावर त्यांना आता सशर्त जामीन मंजूर करणायत आला आहे. परंतु, या घटनेमुळे शिवसेनेवर पुन्हा एकदा टीकेची झोड उठली आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121