नवी उमेद दाखवणारे 'संजीवनी' पर्व !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2021
Total Views |


pune _1  H x W:


देशभरासह आज पुणे महानगरपालिका हद्दीतही कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. 


pune _2  H x W:



कमला नेहरू रुग्णालयात पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते लसीकरण केंद्र सुरु करण्यात आलं.



pune _3  H x W:


लसीकरणाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन सर्वानी ऐकले. यावेळी कोरोना काळात अमूल्य कार्य करणाऱ्या घटकांना लस देण्यात आली.




pune _4  H x W:


पुणे महापालिकेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यासाठी ८ लसीकरण केंद्राचं नियोजन करण्यात आलं असून आज पहिल्या दिवशी ८०० योद्धयांना लस देण्यात आली.


pune _5  H x W:


यावेळी विभागीय आयुक्त श्री. सौरव राव, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते श्री. गणेश बीडकर, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, आरोग्य विभागप्रमुख डॉ. आशिष भारती यांच्यासह नगरसेवक, आरोग्य अधिकारी आणि महापालिका कर्मचारी उपस्थित होते.


pune _6  H x W:


कोरोनाकाळात पुणे हे देशातील सर्वाधिक एक्टिव्ह रुग्णसंख्या असलेलं शहर मात्र सर्वांनीच घेतलेल्या मेहनतीमुळे आज अत्यंत सकारात्मक चित्र आहे.


pune _7  H x W:


लसीकरणाचे आजपासून सुरु झालेलं 'संजीवनी' पर्व नक्कीच नवी उमेद दाखवणारे आहे, अशी भावना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली.
@@AUTHORINFO_V1@@