कोविड रुग्णही करू शकतो मतदान :कशी आहे नवी प्रक्रीया?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Sep-2020
Total Views |
Corona news_1  


तापमान जास्त आले तर सायंकाळपूर्वी करू शकणार नाही मतदान

नवी दिल्ली : बिहार निवडणूकांचे बिगुल वाजले आहे. मात्र, कोविड काळात मतदान होणार तरी कसे. सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे काय ? मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या नादात महामारी पुन्हा ओढावली तर काय करणार ?, असे असंख्य प्रश्न आता बिहार निवडणूक निमित्ताने उपस्थित होत आहे. महाराष्ट्र किंवा अन्य येत्या काळात होणाऱ्या अन्य राज्यांतील निवडणूकांमध्येही हाच पॅटर्न लागू होणार असल्याने कोरोनाच्या सावटात होणाऱ्या या निवडणूका महत्वाच्या आहेत. त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने कोविड मतदान मार्गदर्शक तत्व जाहीर केली आहेत. 
 
 
 
२८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबरपासून तीन टप्प्यात बिहारच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत. १० नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. बिहारचे एकूण ७.२९ कोटी मतदार यात सहभागी होण्याची शक्यता आहे. ३.८५ कोटी पुरुष आणि ३.०४ कोटी महिला मतदार या राज्यात आहेत. कोरोना महामारीमुळे निवडणूकांची रणधुमाळी आणि रंगत किती रंगेल याबद्दल शंका व्यक्त केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मात्र, या संदर्भात ( कोव्हीड 19 ) नियमावली जाहीर केली आहे.
 
 
 
कोरोनामुळे ( कोव्हीड 19 ) गेल्या निवडणूकांसारखा प्रचार रंगणार नाही. शक्तीप्रदर्शन नसेल किंवा महारॅली नसेल. रोड शो किंवा गर्दी जमा करणारे नेत्यांचे भाषण नसणार आहे. निवडणूक केंद्रांवरही मोठ्या रांगा नसतील. एका मतदान केंद्रांवर दीड हजार ऐवजी हजार लोकांनाच बोलवण्यात येणार आहे. सोशल डिस्टंसिंगचेही कडेकोट पालन केले जाणार आहे.
 
 
 
कोरोना विषाणूसह जगत असताना बिहार निवडणूकांचे पडघम वाजले आहेत. दोन मतदारांमध्ये सहा फूटांचे अंतर असणार आहे. एका दिवसापूर्वी बूथ आणि मतदान केंद्राचे निर्जंतूकीकरण केले जाईल. मतदान केंद्रात प्रवेश करताना तसेच बाहेर जाताना तापमान तपासले जाईल, सॅनिटायझर, हॅण्डवॉश या गोष्टींची व्यवस्था केली जाईल. मतदाराच्या शरीराचे तापमान घेतले जाणार आहे.
 
 
कोरोना पॉझिटीव्ह रुग्णही करणार मतदान
 
जर तापमान जास्त आढळले तर अशा व्यक्तीला एक टोकन किंवा प्रमाणपत्र दिले जाईल, ती व्यक्ती मतदानाच्या शेवटच्या तासालाच मतदान करू शकते. मतदान केंद्रात तीन रांगा असतील, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एक रांग, महिला व पुरुषांसाठी वेगवेगळ्या रांगा असतील. मतदाराला सही करण्यासाठी ग्लव्ज दिले जातील. मतदार केंद्राच्या आवारातही सॅनिटायझर दिले जातील. क्वारंटाईन आणि कोरोना रुग्ण आरोग्य अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली शेवटच्या तासाला मतदान करू शकणार आहेत. मतदान करण्यासाठी क्वारंटाईन व्यक्ती आणि कोरोना रुग्णांना सेक्टर मॅजिस्ट्रेटशी संपर्क करायचा आहे. तसेच त्यांच्यासाठी पोस्टल बॅलेट मतदान हा पर्यायही उपलब्ध होणार आहे.
 
 
निवडणूक प्रचार कसा असेल ?
 
 
उमेदवार सुरक्षारक्षकांसह केवळ पाच व्यक्तींना सोबत घेऊन प्रचाराला जाऊ शकणार आहे. रोड शो करताना केवळ पाच गाड्यांचा एक ताफा असेल तर दुसऱ्या पाच गाड्यांसाठी दुसरा ताफा असेल. सोशल डिस्टंसिंग न पाळणाऱ्या उमेदवारावर कारवाईही केली जाऊ शकते. रॅलीमध्ये सोशल डिस्टंसिंग पालन करण्यासाठी निशाणही आखली जातील.
 
 
निवडणूक अर्ज कसा करणार ?
 
 
निवडणूक अर्ज आता ऑनलाईन करावा लागणार आहे. त्याची प्रिंट निवडणूक आयोग अधिकाऱ्याला द्यावयाची आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्र (अॅफिडेव्हीटही) ऑनलाईन भरता येणार आहे. नोटरी केल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्याला याची प्रत सादर करायची आहे. अनामत रक्कम भरण्यासाठी उमेदवाराला ऑनलाईनचा पर्याय देण्यात येणार आहे. तसेच रोख रक्कम भरण्याचाही पर्याय खुला ठेवण्यात आला आहे. नोंदणी करताना उमेदवारला शक्ती प्रदर्शन करता येणार नाही. दोन पेक्षा जास्त गाड्या नोंदणी अर्ज भरताना नेता येणार नाहीत. उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी वेगवेगळ्या वेळेवर बोलवण्यात येणार आहे.
 
 
प्रत्येकाला मास्क सक्ती
 
मतदान प्रक्रीयेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मास्क घालणे बंधनकारक आहे. निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्याला कोरोना झाल्यास त्याच्यासाठी अतिरिक्त अधिकारी नेमण्याचीही तरतूद केली आहे. प्रत्येक व्यक्तीचे तापमान पाहिले जाणार आहे.
 
 
मतमोजणी कशी होणार ?
 
निवडणूक अधिकाऱ्याच्या उपस्थितीत होणाऱ्या मतमोजणी प्रक्रीयेत सात पेक्षा जास्त मतमोजणी टेबल नसतील. या भागाचे निर्जंतुकीकरण केले जाईल. वीवीपॅटचे सील हटवण्याचे काम आणि कंट्रोल युनीटवर निकाल दाखवण्याचे काम एका टेबलवर एकच अधिकारी करणार आहे. निवडणूक निकाल मोठ्या स्क्रीनवर दाखवला जाईल. मतमोजणी करताना आणि करण्यापूर्वी सभागृह निर्जंतूकीकरण केले जाईल.
@@AUTHORINFO_V1@@