या छायाचित्रांबद्दल 'पुलित्सर' विजेत्यांचे म्हणणे काय ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jul-2020
Total Views |
terrerist attack in jk gr



पुलित्सर पुरस्कार विजेत्यांनी टीपलेल्या छायाचित्रांबद्दल आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे अगदी चघळून चर्चा करतात. भारतीय शसस्त्र बले कसा काश्मीरींवर अन्याय करतात हे दाखवण्यात धन्यता मानून फेक न्यूज पसरवणाऱ्या सर्वांना भारतीयांनी एक थेट प्रश्न विचारला आहे. काश्मीरमध्ये बुधवारी सकाळी घडलेल्या हृदयद्रावक घटनेबद्दल तुमचे म्हणणे काय ? असा परखड सवाल विचारला आहे. 



काश्मीरातील बारमुला जिल्ह्यात सोपेर येथे एक हृदयद्रावक घटना घडली. सकाळी दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या भागात हल्ला चढवला होता. या दरम्यान, गोळीबारात एका वृद्धाचा मृत्यू झाला. मात्र, त्यांचा तीन वर्षांचा नातू आपल्या आजोबांना रक्ताच्या थारोळ्यात टाकून पळाला नाही. धीटपणे तो तिथेच बसून राहीला, काहीकाळ त्याने आपल्या आजोबांना तिथून हलवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अपयश आल्यानंतर आजोबांच्या मृतदेहावर तसाच बसून राहिला. गोळीबाराच्या आवाजात न डगमगता तिथेच बसून राहिला. जवानांनी त्याची तिथून सुटका केली.




@@AUTHORINFO_V1@@