काँग्रेस आणि चीनी कम्युनिस्ट पक्षाचे नेमके संबंध काय?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jun-2020
Total Views |
jp nadda_1  H x

वैयक्तिक स्वार्थासाठी राष्ट्रहिताकडे काँग्रेसचे दुर्लक्ष; जेपी नड्डांची घणाघाती टिका

नवी दिल्ली : आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी काँग्रेस पक्षाने राष्ट्रहिताचा बळी देण्याचे काम केले आहे. राजीव गांधी फाऊंडेशनकडे पंतप्रधान रिलीफ फंडातील रक्कम वळती करून देशासोबत विश्वासघात केला आहे. त्याचप्रमाणे काँग्रेस पक्ष आणि चीनचा कम्युनिस्ट पक्ष यांच्यात नेमके काय संबंध आहेत, दोघांमध्ये नेमका कोणत्या विषयावर सामंजस्य करार झाला आहे, याची माहिती देशाला द्यावी अशी घणाघाती टिका भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी काँग्रेस पक्षावर शनिवारी पत्रकारपरिषदेत केली.


काही दिवसांपूर्वी मी राजीव गांधी फाऊंडेशनविषयी काही प्रश्न विचारले होते. त्यावर माजी अर्थमंत्री चिदंबरम यांनी गरज पडल्यास फाऊंडेशनकडून पैसे परत केले जाताल, असे सांगितले. मात्र, जो व्यक्ती आर्थिक घोटाळ्याप्रकरणी जामीनावर आहे, त्याने हे मान्य करावे की नियमांची पायमल्ली करून आणि राष्ट्रहितास बाजुला सारून राजीव गांधी फाऊंडेशनकडून आर्थिक व्यवहार करण्यात आले. त्याचप्रमाणे कोरोना आणि चीन यांच्या आड लपून सोनिया गांधी यांनी मूळ प्रश्नांपासून पळ काढू नये. भारतीय सैन्य देशाच्या सीमांचे आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यास समर्थ असून देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुरक्षित आहे, असे नड्डा म्हणाले.


सत्तेत असताना काँग्रेसने देशाचा विश्वासघात केल्याचा आरोप नड्डा यांनी केला. ते म्हणाले, चीनकडून २००५ ते २००९ या कालावधीतक राजीव गांधी फाऊंडेशनला पैसा का मिळाला होता, याचे उत्तर सोनिया गांधी यांनी द्यावे. व्यक्तिगत फायद्यासाठी पैसे स्विकारून काँग्रेसने राष्ट्रीय हिताचा बळी दिला आहे, त्यामुळे काँग्रेस पक्ष आणि चीनी कम्युनिस्ट पक्ष यांच्यात कोणत्या प्रकारचे संबंध आहे, दोन्ही पक्षांमध्ये कोणत्या विषयांवर सामंजस्य करार झाला आहे, याचे उत्तर देशवासियांना हवे आहे. त्याचप्रमाणे ज्या मेहुल चोक्सीविषयी काँग्रेस पक्ष सतत आरडाओरडा करतो, त्या मेहुल चोक्सीकडून राडीव गांधी फंडामध्ये पैसे का घेण्यात आले आणि त्या बदल्यास चोक्सीला कर्ज का मिळवून देण्यात आले, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे काँग्रेसने द्यावी, असा घणाघातही नड्डा यांनी केला.



@@AUTHORINFO_V1@@